मुंबई ते नागपूर प्रवासाचे स्वप्न साकार, फडणवीस सरकारचा ड्रीम प्रकल्प अखेर पूर्णत्वास

मुंबई ते नागपूर प्रवासाचे स्वप्न साकार. फडणवीस सरकारचा ड्रीम प्रकल्प अखेर पूर्णत्वास, १६ तासांचा प्रवास आता फक्त ८ तासांत

अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, प्रवासाचा वेळ निम्म्यावर आणणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग फेब्रुवारीच्या अखेरीस सर्वांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विकासाला नवा वेग देणारा हा महामार्ग नागपूर ते मुंबई प्रवास केवळ ८ तासांत शक्य करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट राज्याच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाला आहे.

७०१ किमीचा समृद्धी महामार्ग द्रुतगती महामार्ग

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सध्या नागपूरपासून इगतपुरीपर्यंत (625 किमी) कार्यान्वित आहे. आता इगतपुरी ते मुंबईदरम्यानचा शेवटचा ७६ किमी टप्पा पूर्ण झाल्याने फेब्रुवारीत महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी १६ तासांवरून थेट ८ तासांवर आला आहे.

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये

  • ६ लेनचा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग: १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग १५० किमी प्रतितास गतीने प्रवासासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
  • अत्याधुनिक संरचना: ६५ फ्लायओव्हर, 24 इंटरचेंज, ६ बोगदे आणि अनेक वाहन व पादचारी अंडरपास यांचा समावेश.
  • ८ किमी लांब जुळ्या बोगद्यांचा समावेश: इगतपुरीजवळच्या कसारा घाटात जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमसह बोगद्यांची निर्मिती.

पर्यावरणपूरक आणि सामाजिक विकास

महामार्गाच्या उभारणीदरम्यान पर्यावरण संरक्षणालाही प्राधान्य देण्यात आले आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी 80 हून अधिक संरचना बांधल्या असून महामार्गालगत 18 स्मार्ट टाऊन्स उभारण्यात येणार आहेत. या स्मार्ट टाऊन्समध्ये स्थानिक वैशिष्ट्यांवर आधारित उद्योगांची स्थापना होईल, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

६७,000 कोटी रुपयांचा प्रकल्प

हा प्रकल्प सुमारे ६७,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला असून राज्यातील १० जिल्ह्यांना थेट तर १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्ष कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. यामुळे औद्योगिक विकासाबरोबरच सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.

महामार्गाचे लाभ

समृद्धी महामार्गामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च कमी होईल आणि प्रवास अधिक सोयीचा बनेल. मागील दोन वर्षांत महामार्गावर १.५२ कोटी वाहनांनी प्रवास केला असून १,१00 कोटी रुपये टोलमधून जमा झाले आहेत.

उत्कृष्ट प्रवासाचा संकल्प

समृद्धी महामार्ग फक्त रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उभारलेला हा महामार्ग प्रवासाचा आनंद द्विगुणित करणार आहे. फेब्रुवारीपासून या मार्गावरून प्रवास करून तुम्हीही वेग, सुरक्षितता आणि प्रगतीचा अनुभव घ्या!

आपण हे पण वाचू शकता…

१) ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार का?

Leave a ReplyCancel reply

Exit mobile version